LIVE UPDATES

Malvani Research Centre in Sindhudurg : मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार करणार

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा : मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी सिंधुदुर्गात संशोधन केंद्र
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 05:17 PM
views 52  views
Maharashtra Minister Uday Samant announces a Malvani Research Centre in Sindhudurg to preserve and promote Malvani language and culture.

सिंधुदुर्गनगरी : मालवणी भाषा, संस्कृती आणि लोककलेच्या संवर्धनासह मालवणी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मालवणी संशोधन केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्रा’च्या माध्यमातून हे केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. मालवणी भाषेचे शास्त्रीय संशोधन, दस्तऐवजीकरण आणि प्रसार यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार दिपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, एमआयडीसीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मालवणी भाषा ही सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक अस्मितेचा महत्त्वाचा भाग आहे. या भाषेतील समृद्ध शब्दसंपदा, साहित्य, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे जतन करण्यासाठी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. मालवणी भाषेवर शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून तिचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याच्या दृष्टीने या केंद्रामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. या केंद्राची मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली होती.

मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठीतील विविध बोलीभाषांचे शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार करण्यात येणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. मालवणी भाषेतील शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि भाषिक वैशिष्ट्यांचे संकलन व दस्तऐवजीकरण यामुळे या बोलीभाषेचे जतन करण्यास मदत होणार आहे.

लोककला आणि स्थानिक कलाकारांना मिळणार प्रोत्साहन

मालवणी भाषेच्या संवर्धनासोबतच सिंधुदुर्गची सांस्कृतिक ओळख असलेल्या दशावतारासारख्या लोककलांच्या जतन आणि संवर्धनालाही या केंद्रामुळे चालना मिळणार आहे. स्थानिक लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि कलाकारांच्या योगदानाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संधी या माध्यमातून निर्माण होईल.

मालवणी भाषा, साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक वारसा यांचे संशोधन व जतन करणारे हे केंद्र सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवाला नवी दिशा देणारे ठरणार आहे. भाषेच्या संवर्धनासोबतच स्थानिक कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांना प्रोत्साहन मिळण्यासही यामुळे मदत होईल.


ताजी बातमी

View all

Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकरची विभाग स्तरावर विक्रमी पाचव्यांदा निवड
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई
November 05, 2026
Industries Minister Uday Samant announces reduced MIDC fire charges and ₹10 crore funding for electrical infrastructure development at Kudal MIDC.
Sindhudurg MIDC Development : सिंधुदुर्गातील उद्योगांना चालना; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई
November 05, 2026
Industries Minister Uday Samant announces reduced MIDC fire charges and ₹10 crore funding for electrical infrastructure development at Kudal MIDC.
Sindhudurg MIDC Development : सिंधुदुर्गातील उद्योगांना चालना; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
पडेल नं 1 शाळेत ‘आयडियल सेंटर’चे उद्घाटन
November 05, 2026