
आंबोली : वर्षा पर्यटन बंदोबस्ताच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली. ८ आणि ९ ऑगस्ट या दोन दिवसांत तब्बल २४३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, ८ ऑगस्ट ला करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ७० वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ४३, लायसन्स सोबत नसलेल्या ५, ट्रिपल सीट ५, ड्रंक अँड ड्राईव्ह ३, टिंटेड ग्लास १०, सीट बेल्ट न लावलेल्या १ आणि हेल्मेट न वापरणाऱ्या ३ वाहनचालकांचा समावेश आहे.
तर ९ ऑगस्ट ला तब्बल १७३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाहतुकीस अडथळा ७५, लायसन्स सोबत नसणे १८, ट्रिपल सीट १२, ड्रंक अँड ड्राईव्ह ३, टिंटेड ग्लास ४, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण ५, हेल्मेट न वापरणे ३९, जादा प्रवासी २, आरसा नसणे ५, इन्शुरन्स नसणे १, इशारा तोडणे १, इतर ५ आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाणे तसेच जिल्हा वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी ही कारवाई केली, पर्यटन हंगामात आंबोलीत वाढणारी पर्यटकांची गर्दी आणि वाहतूक लक्षात घेता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.











