LIVE UPDATES

अणसूर ग्रामपंचायतीत 'एनसीएमसी कार्ड' नोंदणी कॅम्प

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 19:02 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला : महाराष्ट्र शासनाच्या एन.सी.एम.सी. (NCMC - नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) योजनेअंतर्गत ग्रामपंचायत अणसूर येथे विशेष नोंदणी व मार्गदर्शन कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कॅम्पला स्थानिक नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून एकूण १८० हून अधिक लाभार्थी उपस्थित राहून योजनेचा लाभ घेतला.

डिजिटल सेवांचा विस्तार करणे आणि ग्रामस्थांना आधुनिक वाहतूक व पेमेंट सुविधांशी जोडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, ग्रामपंचायत सदस्य सीमा गावडे, सुधाकर गावडे, सयंमी गावडे, साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, वामन गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, अणसूर

या प्रसंगी उपस्थितांना एनसीएमसी कार्डचे महत्त्व, त्याचे प्रवासातील फायदे आणि डिजिटल व्यवहारांमधील उपयुक्तता याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. कॅम्प यशस्वीपणे पार पडला.