LIVE UPDATES

उबाठाच्या सचिन सावंत यांचा पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश

माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय : ठाकरे सेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून होती ओळख
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 21, 2026 19:50 PM
views 63  views

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे शिवसेनेचे माजी विधानसभा प्रमुख तसेच माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सचिन सावंत तसेच उबाठाच्या कार्यकर्त्यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला.

या प्रवेशावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सभापती हर्षदा वाळके, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपसभापती सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्य दळवी आदी उपस्थित होते.

सचिन सावंत हे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अत्यंत निकटचे पदाधिकारी मानले जात होते. गेली अनेक वर्ष ते ठाकरे शिवसेनेचे एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून परिचित होते. मात्र त्यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने हा ठाकरे शिवसेनेला एक मोठा धक्का मानला जात आहे.