LIVE UPDATES

सावंतवाडी पथविक्रेता समितीच्या सदस्यपदी नाझिया डिसोजा बिनविरोध

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 27, 2026 19:21 PM
views 21  views

सावंतवाडी : केंद्र सरकारचे राष्ट्रीय पथविक्रेता धोरण जाहीर झाले होते. या अनुषंगाने सावंतवाडी शहरातील पथविक्रेता समिती निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी पथविक्रेता समिती सदस्य म्हणून नाझिया मनवेल डिसोजा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गुरुकुलमध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज घाटकर, दीपक सावंत, ड्यूमिंग अल्मेडा, राजा शिवाजीचा उपाध्यक्ष दिलीप पवार, मायकल माडतीस, श्री. सांगेलकर आदी उपस्थित होते. ही समिती पथविक्रेता व्यापारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने 2017 ला स्थापन केली होती.