
सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि सौ. नीलम राणे यांनी मसुरे येथे कै. सरोज परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सौ. सरोज परब यांचे शनिवारी हृदय विकाराने निधन झाले होते.
सरोज परब यांच्या निधनाने जिल्ह्याच्या विकासात्मक राजकीय वाटचालीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नेहमी हसतमुख असणाऱ्या सरोज ताई यांची उणीव आम्हाला निश्चितच भासणार आहे. परब कुटुंबाच्या या दुःखात सहभागी आहोत असे यावेळी सांत्वन करताना खासदार नारायण राणे म्हणाले.
यावेळी सरोज परब यांचे पती शिवाजी परब, मुलगी मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण, मुलगा राहुल परब यांचे खासदार नारायण राणे आणि सौ. नीलम राणे यांनी सांत्वन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जि. प. सदस्य क्षमा हडकर, उपसभापती श्याम झाड, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, डॉ. सुधीर मेहेंदळे, सूर्यकांत फणसेकर, महेश बागवे, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, संदीप हडकर, राजेश गावकर, पंढरीनाथ मसुरकर, जगदीश चव्हाण, अजय प्रभूगावकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, रोहेश गावकर, गणेश परब, पुरुषोत्तम शिंगरे आदी उपस्थित होते.










