LIVE UPDATES

देवगड नगरपंचायतच्या विकास कामांसदर्भात मनसेचं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 26, 2026 19:12 PM
views 51  views

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसदर्भात मनसेच्यावतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे महिला शहर अध्यक्षा  ममता धुरत, मनविसे तालुका अध्यक्ष पप्पु जाधव, मनविसे शहर अध्यक्ष अभिजीत तेली तसेच मनसे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

या निवेदनात अस म्हटल आहे की देवगड किल्ला येथे समुद्रकिनाऱ्यालगत जे गटार बांधले गेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने बांधले गेल्याची तक्रार आहे. तसेच ते गटार झाकण विरहित आहे. सोबत जोडलेल्या फोटो नुसार देवगड किल्ला येथील गटार लाईन हे चुकीच्या पद्धतीने बांधले गेले असल्याने त्या गटारामध्ये सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने घाण पाणी साचून सर्व परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.तसेच तेथे मच्छरचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आढळून येत आहे.गटाराला कोणत्याही पद्धतीचे झाकण नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचे निदर्शनास येत आहे.यावर आरोग्य व स्वच्छता या विभागाचे लोकप्रतिनिधी काय काम करत आहेत.

नगरपंचायतीच्या शाखा अभियंत्याने (Section Engineer) प्रत्यक्ष जागेवर न येता किंवा चुकीची पाहणी करून "काम नियमानुसार पूर्ण झाले आहे" असा अंतिम अहवाल (Completion Certificate) देऊन चुकीच्या पद्धतीने आपण चुकीच्या अहवालाच्या आधारे आपण पेमेंट कस काय मंजूर करता ?.

अशीच जर काम होत असतील किंवा आपल्या कडून होणार असतील तर आपण लोकांच्या आरोग्याशी खेळत आहात. तरीही आपण यावर व्यक्तीश लक्ष घालून आमच्या किल्ला या भागासाठी तातडीची सोय म्हणून मच्छर रोधक फवारणी तातडीची करणे गरजेचे आहे. सदरील गटाराला 'झाकणे लाऊन पावसाच्या आधी काम पूर्ण करावे.अशा आशयाचे निवेदन यावेळी मनसेकडून देण्यात आले आहे.