
पत्रकार परिषदेत कोणते पुरावे करतील सादर ?
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील अनधिकृत धंदे आणि त्यांना मिळणाऱ्या पोलीस संरक्षणावरून शिवसेना आमदार निलेश राणे यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. दहीकर यांच्यावर आरोप करत येत्या दोन दिवसांत जाहीर पत्रकार परिषद घेण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे जिल्हा पोलीस दल आणि जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. श्री. राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत आणि बेकायदेशीर धंदे सुरू असून त्याला पोलिसांकडूनच पाठबळ मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांवर जाहीरपणे आरोप केल्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांनी होणाऱ्या या पत्रकार परिषदेत आमदार राणे कोणते पुरावे सादर करतात ? आणि यावर गृहविभाग काय स्पष्टीकरण देणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










