LIVE UPDATES

देवगड हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 26, 2026 15:36 PM
views 20  views

देवगड : शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते शामू जंगले यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत विविध सामाजिक समस्या, मागासवर्गीय आरक्षण, सामाजिक न्याय आणि समाजसुधारणेतील त्यांच्या योगदानाविषयी मार्गदर्शन केले. तसेच पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी कु.स्पर्श कदम, कु. वैभव जंगले, वेदांत राऊळ व कु. स्वरा शिंद या विद्यार्थ्यांनीही छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर आधारित मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शामू जंगले यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.