
देवगड : देवगड तालुक्यातील तळवडे खडवी (ताम्हाणेतर) येथील नवीन बांधण्यात आलेल्या जेटीवर गौरी-गणपती तसेच अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भाकरवाडी युवक क्लब, तळवडेच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.
दि. १७ सप्टेंबर रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जेटीकडे जाणाऱ्या मार्गावरील तसेच जेटी परिसरातील कचरा साफ करण्यात आला. तसेच विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रकाशयोजनाही करण्यात आली.
हे काम पूर्ण करण्यासाठी मंडळाचे सचिव तथा गावचे सरपंच गोपाळ उर्फ आबा रुमडे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रकाशयोजनेसाठी सुशील म्हापसेकर यांनी सहकार्य केले.या स्वच्छता मोहिमे साठी सुरेश म्हापसेकर व उमेश धुरी यांचे विशेष सहकार्य लाभले या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे भाकरवाडी युवक क्लबच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.










