LIVE UPDATES

वेंगुर्ले भाजपकडून ‘आशीर्वाद का दिया’ उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 19, 2026 17:27 PM
views 32  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला भाजपाच्या वतीने ‘सेवा के २५ वर्ष’ या उपक्रमांतर्गत ‘आशीर्वाद का दिया’ हा विशेष कार्यक्रम वेंगुर्ला तालुक्यात उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ सेवेला अभिवादन करत सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 वेंगुर्ला तालुक्यात विविध  ठिकाणी हे कार्यक्रम करण्यात आले. विविध भागातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

‘आशीर्वाद का दिया’ या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत सेवा आणि सामाजिक सहभागाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला मिळालेल्या गतीचा उल्लेख करत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी  सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सभापती शंकर घारे,  जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, भाजपचे मनवेल फर्नांडिस, नगरसेविका सुषमा प्रभू खानोलकर, महिला पदाधिकारी वृंदा गवंडळकर,

 मच्छीमार सेल अध्यक्ष दादा केळुस्कर, नगरसेवक आकांक्षा परब, गौरी मराठे, विनय नेरुरकर, सचिन शेटये, प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, सदानंद गिरप, गौरी माईणकर भाजपचे कमलेश गावडे, गणेश माईंणकर तसेच भाजपचे तालुका व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.