LIVE UPDATES

आमदार प्रमोद जठारांची कोकणसाद लाईव्हला सदिच्छा भेट

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 25, 2026 12:12 PM
views 76  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी सोमवार २४ ऑगस्ट रोजी कोकणसाद लाईव्ह आणि दैनिक कोकणसादच्या सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण ,सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर आणि कोकणसादची टीम उपस्थित होती. यावेळी मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी कोकणातील राजकारण आणि बदलत्या कोकणाची पुढील दिशा याविषयावर आमदार प्रमोद जठार यांची  दिलखुलास मुलाखत घेतली. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी राजकीय समीकरणे ते भाजपमधील राजकारण यावर भाष्य केले.