
सिंधुदुर्ग : कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत वामन तर्फे यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांच्या मातोश्रींच्या निधन झाले होते. आज म्हात्रे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत तर्फे कुटुंबीयांचे सांत्वन केले. मातृवियोगाच्या दुःखात सहभागी होत त्यांनी तर्फे कुटुंबीयांना धीर दिला तसेच दिवंगत मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण केली.
आईच्या निधनाने तर्फे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना मानसिक आधार दिला. दुःखाच्या या कठीण प्रसंगातून सावरण्याची ताकद कुटुंबीयांना मिळो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शिक्षक संघटनांमधील सहकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भूमिका त्यांनी या भेटीतून अधोरेखित केली.
वामन तर्फे हे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या प्रश्नांवर आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर कार्यरत आहेत. त्यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातही शोकभावना व्यक्त होत आहेत.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. उपस्थितांनीही तर्फे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत दिवंगत मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण केली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








