LIVE UPDATES

समुद्रात तीन वेळा सोडूनही पुन्हा परतली गणेशमूर्ती

दापोलीतील बुरोंडी गावातील चमत्कारिक बाप्पाची अनोखी कहाणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 27, 2026 09:29 PM
views 99  views

रत्नागिरी : कोकणातील एका गावात चक्क लाकडी गणेशमूर्ती तीन वेळा खोल समुद्रातून मच्छीमारांच्या होडीपाशी परत आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून फक्त १२ किलोमीटरवर असलेलं 'बुरोंडी' हे निसर्गरम्य गाव. 'परशुराम भूमी' आणि तामस तीर्थ किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात २००५-०६ च्या सुमारास एक अद्भुत घटना घडली.

बुरोंडीतील कोळी बांधव नंदकुमार आणि दुर्वास साखरकर हे 'एकवीरा' होडीतून हर्णेजवळ खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. तेव्हा त्यांना पाण्यावर एक लाकडी वस्तू तरंगताना दिसली. जवळ जाऊन पाहिलं तर ती श्रीगणेशाची मूर्ती होती. कोणीतरी विसर्जित केली असावी, असं समजून त्यांनी तिची पूजा केली आणि तिला पुन्हा समुद्रात सोडलं.

पण आश्चर्य म्हणजे, बोट पुढे गेल्यावर ती मूर्ती पुन्हा बोटीजवळ आली. त्यांनी ती पुन्हा सोडली, आणि तिसऱ्यांदाही तीच मूर्ती त्यांच्या होडीपाशी परत आली. हा बाप्पाचाच चमत्कार आहे, हे ओळखून त्यांनी ती मूर्ती गावात आणली. संपूर्ण गावाने एकत्र येऊन माघी गणेश जयंतीच्या दिवशी गावातील 'श्री सावरदेवाच्या' मंदिरात या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.

शिसवीच्या लाकडापासून बनलेली ही देखणी मूर्ती तब्बल चार फूट उंच आहे. या मूर्तीला तीन तोंडं आणि सहा हात आहेत. तिच्या पायाशी मूषक आणि सुफलतेचं प्रतीक असलेलं 'बीजपूरक' फळही कोरलेलं आहे. या स्थापनेनंतर गावाला आणि साखरकर कुटुंबाला भरभराटीचे दिवस आले, असं ग्रामस्थ सांगतात. पुढच्या वेळी दापोलीला जाल, तेव्हा बुरोंडीच्या या चमत्कारिक बाप्पाचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका!

संकलन - स्वप्निल परब

मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद


ताजी बातमी

View all

मातृछत्र हरपलेल्या तर्फे कुटुंबीयांच्या दुःखात आमदार म्हात्रे सहभागी
November 27, 2026
साळ खोलपे येथील कुसुम दशरथ भोसले यांचे निधन
November 27, 2026
Zolambe Villagers Protest Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ’ महामार्गाला झोळंबे ग्रामस्थांचा एकमुखी तीव्र विरोध
November 27, 2026
संविधानाची ताकद विधायक राष्ट्रनिर्माणासाठी वापरा : प्राचार्य समिर तारी
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

मातृछत्र हरपलेल्या तर्फे कुटुंबीयांच्या दुःखात आमदार म्हात्रे सहभागी
November 27, 2026
साळ खोलपे येथील कुसुम दशरथ भोसले यांचे निधन
November 27, 2026
Zolambe Villagers Protest Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ’ महामार्गाला झोळंबे ग्रामस्थांचा एकमुखी तीव्र विरोध
November 27, 2026
संविधानाची ताकद विधायक राष्ट्रनिर्माणासाठी वापरा : प्राचार्य समिर तारी
November 27, 2026