
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील साळ खोलपे येथील कुसुम दशरथ भोसले (वय ७५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने भोसले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुसुम भोसले यांच्यावर गोव्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
दोडामार्ग शहरातील बांधकाम क्षेत्रात भोसले कुटुंबाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बांधकाम व्यावसायिक सत्यवान, सिद्धेश (राजू), बहर आणि शैलेश भोसले यांनी या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे भोसले कुटुंबीय तालुक्यात परिचित आहेत. कुसुम भोसले यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता साळ खोलपे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








