LIVE UPDATES

ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र 'लेन'

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने मानले आभार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 27, 2026 09:48 AM
views 79  views

कणकवली : ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH-07 पासिंग वाहनांसाठी स्वतंत्र 'फ्री लेन' उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच व्यापारी वाहनांना टोल मध्ये  50 टक्के सवलत दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक तसेच स्थानिक वाहनधारकांची टोल नाक्यावर होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून, व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार, कणकवली तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर, नामदेव वाडेकर तसेच व्यापारी बांधव उपस्थित होते.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.