
सावंतवाडी : मोहरम निमित्त बसविण्यात आलेले ताबूत विसर्जन करण्यात आले. शहरातू यानिमित्ताने पिरांची मिरवणूक काढण्यात आली. परंपरेप्रमाणे हिंदू धर्मियांनी देखील नैवेद्य दाखवत पीरांचा आशीर्वाद घेतला. मुस्लिमांसह हिंदू बांधव देखील यावेळी उपस्थित होते.
हसेन-हुसेनच स्मरण यानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडुन करण्यात आले. त्यांच्या बलिदानाच स्मरण करत शहरातील ठिकठिकाणीचे पीर उभाबाजार येथे एकत्र आले. जलाल शहा पीर, सरदार निंबाळकर पीर, काझी पीर, सय्यद कादरी पीर आदी विविध भागातील पीर यावेळी उपस्थित होते. सरदार निबांळकर पिरांने परंपरेनुसार श्री देवी भवानी मंदिरात देवीची भेट घेतल्यानंतर पुढील प्रवासात सुरूवात केली. दरवर्षी मुस्लिम बांधव मोहरम सण साजरा करतात. शहरात ७ ठिकाणी ताबूतांचे पूजन करण्यात आले होते. यात सालईवाडा येथे सरदार निंबाळकर पीर, बाहेरचावाडा जलालशहा पीर, होळीचा खुंट-जुना बाजार येथे तहसीलदार पीर आणि सय्यद पीर, माठेवाडा येथे पटवी पीर आणि काझीचे पीर, गर्डी माथाचे पीर असे एकूण सात ठिकाणी ताबूत व पटवे स्थापित करण्यात आले होते. आज शेवटच्या दिवशी पीरांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.रात्री उशिरा या पिरांचे विसर्जन झाले












