
सिंधुदुर्ग : गावखेड्यातून जिद्द आणि कष्टाच्या जोरावर थेट मीडियाच्या न्यूज रूमपर्यंत मजल मारणाऱ्या 'कोकणसाद LIVE' च्या मुख्य उपसंपादक जुईली पांगम यांचा प्रेरणादायी प्रवास खास मालवणी भाषेत श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावरून या विशेष प्रवासावर प्रकाश टाकणारी एक खास मुलाखत आज सायंकाळी प्रसारित केली जाणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार निलेश जोशी यांनी जुईली पांगम यांच्याशी संवाद साधला असून गावखेड्यातील आव्हानांवर मात करत त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले स्थान कसे निर्माण केले, मीडियातील अनुभव, मालवणी बातम्यांसाठीची धडपड याचा रंजक आणि अभ्यासपूर्ण प्रवास या मुलाखतीतून उलगडणार आहे. सादरकर्ते डॉ. सुनील गायकवाड यांच्याकडून शनिवार, २७ जून २०२६ संध्याकाळी ५:३० वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी एफ.एम. १०३.६ मेगाहर्ट्झ (FM 103.6 MHz) आणि 'NewsOnAir' ॲपवर ही मुलाखत ऐकायला मिळणार आहे.











