LIVE UPDATES

बांदा पोलीस ठाण्यात भाजप महिला आघाडीचे निवेदन

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 18, 2026 20:33 PM
views 15  views

सावंतवाडी : बांदा येथे घडलेल्या गंभीर घटनेप्रकरणी आरोपी अबूसाद इब्राहिम शहा याच्यावर कठोर व जास्तीत जास्त कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी, तसेच प्रकरणाचा निष्पक्ष आणि जलद तपास करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीतर्फे बांदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांमध्ये कोणतीही दिरंगाई न करता दोषीवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट होईल, अशी आग्रही मागणी बांदामंडल महिला मोर्चाच्या अध्यक्ष रूपाली शिरसाट यांनी केली. यावेळी  बांदा सरपंच प्रियांका नाईक, महिला आघाडीच्या स्मिता पेडणेकर, माधवी गाड, अवंती पंडित, बांदा शहराध्यक्ष निलेश नाटेकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, तसेच भाजप पदाधिकारी संदीप बांदेकर, अमित घोंगडे, साईशकुमार केसरकर आणि राकेश केसरकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.