LIVE UPDATES

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ह्याच दीपकभाईंना शुभेच्छा

आम. केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेमार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 18, 2026 20:58 PM
views 53  views

वेंगुर्ला : आमदार दीपक केसरकर यांची नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांवर भर असते. वाढदिवशी सुद्धा कोणते मोठे सेलिब्रेशन न करता समाजोपयोगी उपक्रम करण्याचा त्यांचा आग्रह असतो. यामुळे यावर्षी युवासेनेने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा उपक्रम राबविला. शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ह्याच दीपकभाईंना शुभेच्छा असल्याचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे वेंगुर्ला परबवाडा येथे म्हणाले. 

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुका युवासेनेच्या वतीने व युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे पुरस्कृत तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांत जात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डेरे बोलत होते. त्यावेळी युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, तालुका संघटक विशाल राऊत, सोशल मीडिया प्रमुख स्वप्नील होसमणी, विभाग प्रमुख प्रतीक खानोलकर, प्रथमेश सावंत आदी प्रमुख पदाधिकारी व त्या त्या गावातील युवसैनिक उपस्थित होते. 

यावेळी वयुवासेना स्वप्नील गावडे म्हणाले, तळागाळात नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी युवासेना नेहमी कार्यरत असते. अगदी प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालया पर्यंत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी युवा सेना नियमित नेहमीच अग्रस्थानी असते यामुळे यावर्षी आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस आम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या सानिध्यात साजरा केला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला सुद्धा पुढे अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे गावडे यांनी सांगितले.