
मालवण : ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या स्पर्धेत ७७+ किलो वजनी गटात श्रेया समीर वारंग हिने प्रथम क्रमांक पटकावला. ५३ किलो वजनी गटात सानवी संदीप गावडे हिने द्वितीय, तर रिया दीपक शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच ५८ किलो वजनी गटात अनुष्का गंगाराम गावडे हिने तृतीय, तर ७७ किलो वजनी गटात मुग्धा सुहास साटम हिने तृतीय क्रमांक मिळवत प्रशालेचे नाव उज्ज्वल केले.
या यशस्वी विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षिका सौ. अर्चना देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश कृष्ण तावडे, संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे, संस्थेचे सचिव घन:श्याम राणे, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










