
देवगड : तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार चा एस.एस.सी. मार्च 2026 निकाल शाळेचा निकाल -९८.०३% लागला असून सेमी इंग्रजी निकाल 100% लागला आहे. तर मराठी माध्यम निकाल 98.00% लागला आहे. या वेळी एकूण 51 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यात कु.वृपाली धनंजय कुळये हिला 96.60% गुण मिळून प्रशालेत प्रथम क्रमांक आला तर 92.80% गुण मिळवून कु.पार्थ सचिन लब्दी द्वितीय क्रमांक तर कु. प्रितम उमेश राठोड हा प्रशालेत 91.40% गुण मिळवत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.यावळी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष संदिप तेली, उपाध्यक्ष राजेंद्र व. म्हापसेकर, खजिनदार संतोष बा. वरेरकर,सर्व संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक पालक संघ पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.










