
कणकवली : शनिवारी मध्यरात्रीपासून कणकवली शहर असं ग्रामीण भागात वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला होता तसेच विजांचा कडकडाट देखील होत होता. यावेळी मोठ्या प्रमाणात आलेल्या वाऱ्यामुळे शहरातील चौंडेश्वरी मंदिर नजीक नगरसेवक बंडू हर्णे यांच्या घरावर रुद्राक्षाच्या झाडाची मोठी फांदी पडली. त्यामध्ये घराची कौले फुटून घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सध्या मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. रात्रीपासून पावसाच्या सरी या कणकवली सह आजूबाजूच्या गावांमध्ये पडत आहेत. वातावरण देखील ढगाळ आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. सध्या कणकवली तालुक्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी आणि वादळी वारा सुरूच आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर असावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










