LIVE UPDATES

प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस दलात निवड

रामू जंगलेचा खास सन्मान
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 24, 2026 20:55 PM
views 29  views

सावंतवाडी : सरमळे शितपवाडी येथील रामू बाबू जंगले या युवकाची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर रामू जंगले यांचे आई-वडील सौ सावित्री बाबू जंगले, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ. मुग्धा ठाकरे, तळवडे तलाठी कोमल चौधरी, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सिताराम लांबर, माजी सैनिक विठ्ठल लांबर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाष सावंत, मराठा अकॅडमीचे संचालक बापू परब, प्राचार्य श्री मोहिते, धोंडू जंगले, गुरुनाथ कासले, केसरी उपसरपंच संदीप पाटील, आनंद वरक, विलास जंगले, लक्ष्मण बरागडे, प्रसाद सावंत, शिक्षक दत्ता सावंत, रामा गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दत्ता सावंत यांनी रामू जंगले याच्या प्राथमिक ते पुढील शिक्षण प्रवासाचा आढावा घेत त्यांनी रामूने पोलीस दलात जाण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकला. यावेळी रामू जंगले याने आपल्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच विशेषतः डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी विजय जंगले, जगदीश जंगले, लक्ष्मण काळे, दीपक पटकारे, आनंद जंगले, संजय झोरे, गोविंद कोकरे, मंगेश फाले, मंगेश कोकरे महेश्वर समजीकर, ओंकार गावकर, सर्वेश वारंग, चंद्रकांत जंगले, दिनेश खरात, संतोष लांबर, तुकाराम जंगले, चंद्रकांत जंगले, बिरू काळे, पदु जंगले, देऊ जंगले, लक्ष्मण  पाटील, सुरेश लांबर, विकास जंगले, सिद्धेश यमकर आदींसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी रामू जंगले यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सन्मान करीत त्याच्या पोलीस सेवेतील पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सन्मान सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन समस्त शितपतवाडी आणि सिंहगर्जना ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मोहिते यांनी, सूत्रसंचालन शितपवाडी शाळेचे शिक्षक दत्ता सावंत यांनी केले. तर आभार सिताराम लांबर यांनी मानले.