
सावंतवाडी : भाजप जनसंपर्क कार्यालय, सावंतवाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या १३७ व्या भागाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवादातून देशाच्या विकासाचा संकल्प, युवकांसाठी ‘नशामुक्त भारत’ मोहिमेचा संदेश तसेच समाजहिताच्या आणि राष्ट्रउभारणीच्या विविध विषयांवर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचे विचार अत्यंत उत्साहाने ऐकले.
सावंतवाडी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात एकत्र येत उपस्थितांनी या मार्गदर्शनातून राष्ट्रकार्यासाठी नवीन ऊर्जा मिळाल्याची भावना युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केली.










