
सावंतवाडी : प. पु. श्री. काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्या गुरुमाऊली शोभाताई यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. श्रावण सप्ताह सांगता व दासबोध समाप्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काडसिद्धेश्वर भवन, बाजारपेठ सावंतवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे.
यानिमित्ताने काकड आरती, भजन, प्रवचन आदि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी महाप्रसाद होणार असून सायंकाळी ७.३० वा हेळेकर प्रासादिक भजन मंडळ, कारिवडे पेडवेवाडी यांचे भजन होणार आहे. तसेच दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. भोंसले निवास वजराट येथे दासबोध समाप्तीचा कार्यक्रम होणार आहे. तरी भक्तांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे










