LIVE UPDATES

के.एस.आर ग्लोबल एक्वेरियममध्ये 'मन की बात'चे प्रक्षेपण

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 16:03 PM
views 26  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या १३७ व्या भागाचे थेट प्रक्षेपण भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आपल्या केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम येथे पाहिले. या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प, युवकांसाठी नशामुक्त भारताचा महत्त्वाचा संदेश देत समाजहिताशी निगडित विविध विषयांवर देशवासीयांना मोलाचे मार्गदर्शन केले.

केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम येथे मोदीजींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदीजींचे विचार ऐकले. यावेळी जिल्हा परिषदेच्या कोलगाव मतदार संघाचे सदस्य मायकल डिसोजा, सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, भाजपा आंबोली मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विनेश तावडे आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे हे विचार ऐकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात' हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतिक असून ‘मन की बात’ हा उपक्रम सामान्य जनतेशी थेट जोडणारा संवाद ठरत असल्याचे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.