
सावंतवाडी : सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्तमंदिर, सबनीसवाडा येथे मंगळवार १ सप्टेंबर २०२६ रोजी श्री टेंब्येस्वामी महाराज जयंती उत्सव होणार असून सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
या कार्यक्रमाचा व स्वामी दर्शनाचा सर्व स्वामीभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक देवस्थान उपसमिती सावंतवाडी यांनी केले आहे.
यावेळी सकाळी ८ वाजता श्री एकमुखी दत्तपूजा, अभिषेक, एकादशनी, ९ वाजता श्री.सत्यदत्त पूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता माऊली भजन मंडळ बावळाटच्या सौ. रक्षंदा परब आणि सहकलाकार यांचा भजनाचा कार्यक्रम, ७ वा.नामस्मरण व आरती, ८ वाजता पालखी सोहळा, ९ वाजता स्थानिक भजन, १० वा. श्री इस्वटी भजन मंडळ सबनीसवाडा यांचा भजनाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन केले आहे.










