LIVE UPDATES

सिंधुदुर्ग महिला काथ्या क्लस्टरच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंतांची भेट

२२ लाखांचे वीज बिल माफ करण्याची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 04:58 PM
views 80  views

सिंधुदुर्ग : महिला काथ्या क्लस्टरच्या कामातील अडचणी व विविध प्रलंबित मागण्यांबाबत क्लस्टरचे अध्यक्ष एम. के. गावडे आणि संचालक प्रज्ञा परब यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी क्लस्टरच्या अडचणी मांडून त्या सोडविण्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली.

या भेटीदरम्यान क्लस्टरच्या वीज बिलाचा प्रश्न मांडण्यात आला. अद्याप एकही युनिट वीज वापरलेली नसतानाही सुमारे २२ लाख रुपयांचे वीज बिल आले असून, हे बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच कोविडमुळे प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात वाढ झाली असून, सुरुवातीला ७ कोटी ५८ लाख रुपये असलेली प्रकल्पाची रक्कम प्रत्यक्षात ११ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रकल्पाचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी किमान दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असून, यंत्रसामग्रीचे काम पूर्ण होण्यासाठीही निधीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. याशिवाय शासनाच्या भांडार खरेदीमध्ये २०१६ पर्यंत संस्थेला असलेले आरक्षण पुन्हा सुरू करण्यात यावे, जेणेकरून कोकणातील शेतकरी व महिलांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळेल, अशी मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून क्लस्टरच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली.

ताजी बातमी

View all

Vaibhav Suryavanshi celebrates his record-breaking 28-ball century against UAE
वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रमी पराक्रम! अवघ्या ५२ चेंडूंमध्ये ठोकले द्विशतक; २८ चेंडूंत शतक झळकावत रचला इतिहास
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Leopard Attack Dodamarg : घरात घुसून बिबट्याकडून 8 पिल्लांचा फडशा
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Vengurla News : जि. प .अध्यक्ष प्रमोद कामतांनी घेतले मातोंड देवी सातेरीचे दर्शन
November 24, 2026
MLA Shekhar Nikam speaks about Konkan's water rights and protection of Ratnagiri Alphonso Mango GI tag
कोकणाची तहान भागविल्याशिवाय कोयनेचे पाणी अन्यत्र जाणार नाही : आमदार शेखर निकम
November 24, 2026
संबंधित बातम्या

Vengurla News : मातोंड देवी सातेरीचे लोकप्रतिनिधींनी घेतले दर्शन
November 24, 2026