
कणकवली :दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त भक्तिमय वातावरणात पहाटेची पूजा संपन्न झाली.या पवित्र पूजेचा मान शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांना लाभला. त्यांनी सहकुटुंब श्री कुणकेश्वर देवाचे मनोभावे दर्शन घेत पूजाअर्चा केली.याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. एकनाथ तेली देवस्थान समितीचे पदाधिकारी, मानकरी व ग्रामस्थ तसेच संजय आंग्रे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.श्री कुणकेश्वर देवाच्या चरणी कोकणवासीयांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सर्वांगीण विकास कल्याणासाठी आंग्रे यांनी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.










