
कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्यामार्फत आणि श्री देव कुडाळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ‘भव्य नरकासुर देखावा स्पर्धा २०२६’ चे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक अभि गावडे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, मागील वर्षीचा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदा बक्षिसांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
मागील वर्षी (२०२५) या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी प्रथम पारितोषिक २५,००० रुपये, द्वितीय १५,००० रुपये, तृतीय ५,००० रुपये आणि उत्तेजनार्थ रोख बक्षिसे देण्यात आली होती. कलाकारांचा आणि रसिकांचा वाढता स्फूर्तीदायक प्रतिसाद पाहता, यंदाच्या द्वितीय वर्षात बक्षिसांची नगरसेवक अभिषेक गावडे यांच्याकडून खैरात करण्यात आली आहे. यंदा प्रथम क्रमांक ५०,००० रुपये, द्वितीय क्रमांक ३०,००० रुपये, तर तृतीय क्रमांक १५,००० रुपये अशा आकर्षक भव्य रोख रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
कुडाळ बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याने सर्व व्यापारी, नागरिक आणि पर्यटकांची येथे अलोट गर्दी पाहायला मिळते. भव्यदिव्य नरकासुर पुतळे, उत्कृष्ट प्रकाशयोजना आणि कलाकारांची कल्पकता पाहण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
नगरसेवक अभि गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि संकल्पनेतून सुरु झालेला हा उपक्रम कुडाळ शहरातील दिवाळीोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत असून, यंदाच्या स्पर्धेतही अधिकाधिक संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








