LIVE UPDATES

ओरोस इथं भातशेती नुकसानीची लोकप्रतिनिधी - कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 17:33 PM
views 16  views

कुडाळ : यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे तसेच विविध समस्यांमुळे ओरोस बु. परिसरातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी व कृषी अधिकाऱ्यांनी नुकतीच बाधित शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. ओरोस परिसरातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर भरपाई मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे भात पीक वाया गेले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीची दखल घेत ओरोस बु. येथील काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेण्यात आला. शासन दुष्काळग्रस्त व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून एकाही बाधित शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, असा विश्वास लोकप्रतिनिधींनी पाहणी दरम्यान व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, कृषी अधिकारी सौ. सामंत तसेच शेतकरी संजय परब, कासार, धुरी, त्रिभुवने यांच्यासह इतर ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.