
कुडाळ : कुडाळ शहराच्या विकासासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रचंड निधी आणला. तसेच माजी खासदार विनायक राऊत यांनीही शहरासाठी योगदान दिले आहे. कुडाळमधील नाट्यगृह, क्रीडांगण, बडमिंटन, महिला बाल रुग्णालय अशी अनेक कामे त्यांनी केली.वैभव नाईक यांनी गणेश घाटासाठी काही वर्षापूर्वी पाच कोटी विशेष निधी आणला होता. मात्र, कुडाळ नगर पंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्षांनी त्याला एनोसी दिली नाही. ती थांबवून ठेवण्यात आली. कारण वैभव नाईक यांना श्रेय मिळणार ते मिळू नये. त्यामुळे गणेश घाटाचे संपूर्ण श्रेय हे माजी आमदार वैभव नाईक यांचेच आहे. त्यामुळे त्याचे श्रेय अन्य कोणीही घेऊ नये, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक व शहर प्रमुख संतोष शिरसाट यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत रविवारी येथे दिला.
कुडाळ येथील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शाखेत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, प्रवक्ते बाळा पावसकर, युवा सेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, अतुल बंगे, युवा सेना समन्वयक अमित राणे व गुरु गडकर उपस्थित होते.
राजन नाईक म्हणाले, आजपर्यंत कुडाळ शहराच्या विकासासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी भरघोस निधी आणला.तसेच माजी खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ शहरासाठी योगदान दिले आहे.त्यामुळे गणेश घाटाचे संपूर्ण श्रेय माजी आमदार वैभव नाईक यांचेच आहे. कुडाळ शहरातील नागरीकांनी वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती की, गणेश घाटाकडे येणारे सांडपाणी हे एका बाजूला वर्ग झाले पाहिजे. त्यात लक्ष घालून वैभव नाईक यांनी काही वर्षापूर्वी पाच कोटी विशेष निधी आणला होता. मात्र कुडाळ नगर पंचायतीच्या तत्कालीन माजी नगराध्यक्षानी एनोसी दिली नाही. ती थांबवून ठेवण्यात आली. कारण वैभव नाईक यांना श्रेय मिळणार ते त्यांना मिळू नये. अजूनही तो निधी पडून आहे. तो निधी काही दिवसांत म्हापुरुष मंदिराच्या ठिकाणी वर्ग होणार आहेत.त्याचे श्रेय सुद्धा सत्ताधारी घेतील हे आम्हाला माहिती आहे. ते पाच कोटी सध्या पत विभाग खात्यात आहेत. सध्या बांधण्यात आलेल्या गणेश घाटाचा तीन वेळा प्लॅन बदलण्यात आला. गणेश घाटात गणपती उतरविण्यासाठी पूर्वी रॅम होता. आता तो सुद्धा नाही आहे. पाच- सहा फुटाचे मातीचे गणपती गणेश भक्त कसे काय घेऊन जाणार आहेत हे आताच्या कुठच्याही सत्ताधारी नगर सेवकांना दिसेल नाही. त्यांना फक्त श्रेय घ्यायचे माहिती आहे. परंतु ते कसे घ्यायचे? असा सवाल त्यांनी केला. गणेश भक्तांचे हाल कसे होणार हे आताच्या गणेश घाटात दाखविण्यात आले आहे. पूर्वी त्याठिकाणी रॅम होता तोही काढण्यात आला. त्यामुळे भक्तांचे हाल हे शंभर टक्के होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मंदार शिरसाट म्हणाले, कुडाळ शहरात गणेश घाट व्हाव्हा ही शहरवासियांची मागणी होती.गणेश घाट आमच्या श्रद्धेचा भाग होता. जेव्हा आपण नगरसेवक झालो. त्यावेळी कुडाळ शहरात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन पालकमंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आम्ही माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता. ज्यावेळी वैभव नाईक आमदार होते त्यावेळी 9 फेब्रुवारी 2024 ला त्या कामाचे टेंडर लागले आणि गणेश घाटाचे काम हे दोन टप्यात होते.
पहिल्या टप्प्यात 90 लाखाचे टेंडर लागले. आणि ते टेंडर झाल्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली. त्यानंतर 11 ऑक्टोबर 2024 ला रत्नागिरीचे कंत्राटदार के. एस. पवार यांना देण्यात आले. या कामाची वर्क ऑर्डर ही माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात झाली होती. त्यामुळे या कामाचा पाठपुरावा आणि सर्व श्रेय माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत व मंजूर केल्याबद्दल पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचेच आहे. दुसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून 29 मार्च 2022 ला पाच कोटी निधी या गणेश घाटासाठी मंजूर झाला होता.या कामाचा पाठपुरावा वैभव नाईक यांनी केला होता. तत्कालीन पालमंत्री यांनी पर्यटमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र दिले होते की कुडाळ उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांना गणेश घाटासाठी 90 लाख रुपये देण्यात यावे. त्यानुसार आदित्य ठाकरे यांनी तात्काळ निधी दिला होता. यासंदर्भात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
संतोष शिरसाट म्हणाले, माजी आमदार वैभव नाईक यांनी शहरातील बरीच विकास कामे केली आहेत. कुडाळमधील नाट्यगृह, क्रीडांगण, बडमिंटन, महिला बाल रुग्णालय अशी अनेक कामे त्यांनी केली. त्याच्यामध्ये त्यांनी भंगसाळ नदी सुशोभिकरणासाठी फ़ंड आणला. जवळ-जवळ 2023 पासून या कामाचा पाठपुरावा सुरु होता आणि 2024 मध्ये त्याची वर्क ऑर्डर लागली. भंगसाळ नदी सुशोभिकरण त्यात गणेश घाट व महापुरुष मंदिर सुशोभिकरणाचा भाग सुद्धा होता.ते काम त्यावेळी भाजपच्या सदस्यांनी अडवले होते. त्यामुळे गणेश घाटाचे संपूर्ण श्रेय माजी आमदार वैभव नाईक यांनाच जाते. आमच्याच एका सदस्याने पैशाच्या मोहासाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. तो सदस्य दुसऱ्या पक्षात गेला नसता तर आमचीच सत्ता असणार होती. उद्याचे उदघाटन सुद्धा माजी आमदार वैभव नाईक यांच्याच हस्ते होणार असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.











