
वैभववाडी : वैभववाडी तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी रविंद्र साळुंखे उपाध्यक्षपदी प्रकाश खाड्ये, सचिवपदी वैभव मोहिते यांची बिनविरोध निवड झाली.नुकत्याच झालेल्या संघटनेच्या बैठकीत नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.पोलीस पाटील संघटनेची नुकतीच बैठक पार पडली.याबैठकित नव्याने तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष:रविंद्र साळुंखे उपाध्यक्ष: प्रकाश खाड्ये, सचिव: वैभव मोहिते सहसचिव: पांडुरंग हरयान,खजिनदार: सागर घाग , प्रसिद्धीप्रमुख रुपेश कांबळे , सौ. स्नेहा शेळके ,कार्यकारिणी सदस्य विजय दळवी, अस्मिता चव्हाण यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली गाव कामगार पोलीस पाटील यांच्या विविध समस्या शासन व प्रशासनापुढे प्रभावीपणे मांडणे, सदस्यांचे हित जपणे तसेच संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांच संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.










