वैभववाडी : खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीचा सप्ताह तथा जत्रोत्सव ११ डिसेंबरला होत आहे. यानिमित्त राज्यातील भजनक्षेत्रातील दिग्गज भजनीबुवांचा 'भजन महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.
खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टीचा सप्ताह तथा जत्रोत्सव ११ डिसेंबरला होणार आहे. या जत्रोत्सवाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. जत्रोत्सवानिमित्त भजनक्षेत्रातील दिग्गज भजनीबुवांचा भजनमहोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाकरीता भजन महर्षि बुवा विजय परब-देवगड, भजन सम्राट बुवा भगवान लोकरे, मुंबई,लोकप्रिय गायक बुवा उमेश सुतार, (मुंबई)नामवंत बुवा प्रमोद हरयाण (मुंबई) बुवा संतोष शिर्सेकर रत्नागिरी, बुवा अजित मुळम देवगड या बुवांना निमत्रिंत करण्यात आले आहे.
पहाटे १० वाजल्यापासुन कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. सकाळी १० वाजता- घटस्थापना,सकाळी १० ते सायकांळी ६ स्थानिक भजने, ६ वाजता भजन महोत्सवाला प्रारंभ, रात्री ११ वाजता- पालखी सोहळा, रात्री १२ ते ३ भजन महोत्सव, त्यानंतर १२ डिसेंबर सकाळी ८ वाजेपर्यत स्थानिक भजने,९ वाजता.अभिषेक, दुपारी एक वाजता महाप्रसाद अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे.
दरम्यान जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असुन गावातील सर्व ग्रामस्थं रात्रदिवस जत्रोत्सवाची पुर्वतयारी करीत आहेत. या जत्रोत्सवाकरीता मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. तरी या जत्रोत्सवाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री.देवी आदिष्टी देवस्थान उपसमितीच्यावतीने करण्यात आले आहे.