सावंतवाडी : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी प्रथम क्रमांकाच मानकरी ठरले आहे. ९ ऑक्टोबरला मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते चितारआळी मंडळाला गौरविण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरले आहे. बुधवारी ९ ऑक्टोबरला मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंडळाला गौरविण्यात येणार आहे. खास. अनिल देसाई, आम. सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सावंतवाडीच्या चिताराळी मंडळाला ३४ वर्ष झाली असून विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम मंडळाने राबविले आहेत. चलचित्र देखावे हे या मंडळाचे खास आकर्षण असते. शासनाचा यंदाचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक या मंडळाने पटकाविला आहे. यासाठी मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र चितारी, सचिव मंदार नार्वेकर, खजिनदार योगेश सुराणा व चिताराळी मंडळाच्या सदस्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.