
देवगड : तालुक्यातील बापर्डे येथील श्री जय भवानी मित्र मंडळ, बापर्डे गायकवाडवाडी यांच्या वतीने सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला ‘खेळ पैठणीचा’ (होम मिनिस्टर) हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत एकूण २४महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. सहभागी प्रत्येक महिलेला मंडळाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.या स्पर्धेत शुभ्रा विश्राम साळुंके यांनी प्रथम क्रमांक पटकावून पैठणीची मानकरी होण्याचा मान मिळविला. सौ. स्वरा संदेश गायकवाड यांनी द्वितीय, तर सौ. शिला रवींद्रनाथ तेली यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाला बापर्डे गावचे उपसरपंच अतुल राणे आणि बापर्डे सोसायटीचे चेअरमन अजित राणे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. तसेच श्रीकृष्णा गायकवाड, दत्ता गायकवाड, विलास साळुंके, दत्तात्रय साळुंके आणि संतोष साळुंके यांचीही उपस्थिती लाभली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जय भवानी मित्र मंडळाचे कार्यकर्ते संदेश गायकवाड, प्रज्वल गायकवाड, मंदार तेली, निलेश गायकवाड, प्रशांत साळुंके आणि श्रीकांत गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच महिला मंडळाच्या कमल तेली, मयुरी साळुंके, नंदा तेली, अपर्णा तेली, सारिका तेली आणि वैशाली तेली यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सहभागी महिला, मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
ताजी बातमी
View all










