
खारेपाटण : खारेपाटण बाजारपेठेतील रस्त्यावर पसरलेल्या चिखल आणि मातीमुळे व्यापारी, ग्राहक तसेच बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. अचानक पडलेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख महेश कोळसुलकर यांनी आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
कोळसुलकर यांनी बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था मांडत हा रस्ता कधी होणार, असा सवाल उपस्थित केला होता. तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी सुसज्ज काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार करण्याची मागणीही केली होती.
दरम्यान, त्यांच्या मागणीची दखल घेत बुधवारी प्रशासनाकडून बाजारपेठेतील रस्त्यावर साचलेली चिखल-माती हटविण्यात आली. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी काही प्रमाणात सुरळीत झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मात्र, केवळ चिखल-माती हटवून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही. भविष्यात पावसाळ्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खारेपाटण बाजारपेठेत लवकरात लवकर सुसज्ज काँक्रिटीकरणाचा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी महेश कोळसुलकर यांनी केली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








