LIVE UPDATES

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नियोजन

फेरी विक्रेते, रिक्षा, दुचाकी व चार चाकीसाठी पार्किंगची व्यवस्था : प्लस्टिक पिशवी आढळल्यास कारवाई
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 28, 2026 15:39 PM
views 52  views

दोडामार्ग : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कसई दोडामार्ग शहराच्या मार्केटची नगरपंचायत येथे नियोजन सभा पार पडली. यावेळी फेरी विक्रेते, रिक्षा, पार्किंगसाठी नगरपंचायतच्या वतीने मार्किंग करून देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बेशिस्त वाहन, फेरीवाले निदर्शनास आले तर त्यांच्यावर दांडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपंचायतने सांगितले.

कसई दोडामार्ग नगरपंचायत येथे गणेश चतुर्थीची नियोजन बैठक शुक्रवारी पार पडली, यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, पोलीस उपनिरीकक्षक नरेंद्र पाटील, व्यापरी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट, रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष संतोश हळणकर, एसटी महामंडळचे राजन धरणे, आरोग्य विभाग प्रशांत चव्हाण, शहरातील नागरिक आदी उपस्थित हिते. 

यावेळी सर्व प्रथम बाजारात बसणाऱ्या फेरी विक्रेत्यांचा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पिंपळेशवर चौक ते भेडशी रोडवर दीड मिटरचे रेखांकन करून प्रत्येक फेरी विक्रेत्याला बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रिक्षा चालक मालक, टेम्पो चालक यांना लाईन आउट करून देण्यात येणार आहे. त्या लाईन आउट मध्येच राहून सर्वांनी नियम पळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच आयी रस्त्यावर मराठी शाळा येथे पार्किंग, बांदा रस्त्यावर जिल्हा बॅंकच्या बाजूला, गोवा रस्त्यावर पंचायत समितीच्या बाजूला अश्या प्रकारे त्याठिकाणी फलक लावून पार्किंगची व्यस्था करण्यात येणार आहे. या नियमात सर्वांनी आपली वाहने पार्किंग करावी. जर कोणीही बेशिस्तपणे वाहने पार्क केली तर त्याच्यावर नगरपंचायत व पोलीस प्रशासन दांडात्मक कारवाई करणार आहे. 

प्लस्टिक पिशवी आढळल्यास कारवाई 

दोडामार्ग शहरात व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशवी देणे पूर्णपणे बंद करावे. तसेच व्यापारी किंवा ग्राहक यांच्या जवळ प्लास्टिक पिशवी आढळल्यास दांडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

लाईन आउट करण्यासाठी केली पाहणी 

दरम्यान नियोजन सभा संपल्यावर नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन, व्यापारी संघ आदींनी शहरातील चारही रस्त्यावर फेरीवाले, विक्रेते, रिक्षा यांना लाईन मार्किंग करून देण्यासंदर्भात पाहणी केली. बेशिस्त वागणाऱ्याला सामाना सहित उचलून कारवाई करण्याचे आदेश यावेळी मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी केले आहे.