
कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे नूतन कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी रखडलेल्या कामांबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
गेली कित्येक वर्षे रखडलेल्या आचरा बायपास रस्त्याला पर्यायी मार्ग निर्माण करून आचरा बायपास रस्ता पूर्ण करावा. हळवल येथील रेल्वे उड्डाणपूलाला जोड रस्त्यासाठी लागणाऱ्या जमीन भूसंपादनासाठी निधी मंजूर आहे. मात्र गेली अनेक वर्षे त्याबाबत पुढील कार्यवाही झालेली नाही. तसेच आपल्या अखत्यारीत असणारे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत, ते दुरुस्त करण्याची मागणी सतीश सावंत व शिवसेना शिष्टमंडळाने केली. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता म्हणून नि:पक्षपातीपणे आणि चांगले काम करण्याची अपेक्षा यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने व्यक्त केली.
याप्रसंगी उबाठा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कुडाळ उपतालुकाप्रमुख सचिन कदम, राजू घाडीगावकर, अमेय ठाकूर, मिलिंद आईर उपस्थित होते.










