
कणकवली : जिल्हा बँकेच्या शिपाई पदाच्या भरतीसाठी आज जिल्ह्यात परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून २६०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे. कणकवली कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळाली. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेतून प्रवेश देण्यात आला. सकाळी ११ ते ११.५० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात प्रवेशाची वेळ निश्चित करण्यात आली होती.
त्यानंतर दुपारी १२ ते १.१५ या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली तालुक्यातील विविध केंद्रांवर आज ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा बँकेकडून नियोजन करण्यात आले आहे.










