LIVE UPDATES

कणकवली शहरातील भाजी मार्केटचा भाग कोसळला

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 20:54 PM
views 53  views

कणकवली : कणकवली शहरांमध्ये ग्रामपंचायत काळात बांधण्यात आलेल्या जुन्या भाजी मार्केटच्या इमारतीचा काही भाग हा आज सायंकाळच्या सुमारास कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.  यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांची भेट घेतली. तसेच कोसळलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी झालेली ही इमारत तातडीने निर्लेखित करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची सुरक्षित व्यवस्था केली जाईल. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येईल. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जीर्ण इमारत हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे पारकर यांनी सांगितले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, अनिल मेस्त्री, राजू म्हापसेकर, आबा दुखंडे, जमील कुरेशी, संतोष काकडे, संतोष महाजन, सचिन कुवळेकर, गुरु मोहम्मद शेख, दत्ता प्रसाद बिड्ये, भगवान कासले, संगीता जयताळकर, एजाज काझी, देवराज जाधव, बंडू कोदे, जयवंत जाधव, शेखर बाणे, लक्ष्मण महाडिक, सहिद नाईक, अविनाश गावडे, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपुत आदी उपस्थित होते.