LIVE UPDATES

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन तहसीलदारांचं आवाहन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 20:49 PM
views 12  views

कुडाळ : वालावल-मुहूर्तळीवाडी येथील दरड कोसळल्याच्या घटनेनंतर कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. "प्रशासन घटना घडल्यापासूनच अपघात स्थळावर असून बाधित लोकांच्या सतत संपर्कात आहे," असे त्यांनी सांगितले.  दि. २४/०४/२०२६ रोजी मा. प्रांतअधिकारी काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन बैठक झाली होती, ज्याला स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.घटनेनंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट दिली. धोक्याचा दगड हलवण्यासाठी प्रशासनाने स्वतः जेसीबीची सोय करून सर्व सहकार्य केले.

तहसीलदार सचिन पाटील यांनी आज स्वतः घटनास्थळाला भेट देऊन आढावा घेतला असून, सुरक्षेसाठी संबंधित लोकांना स्थलांतरित होण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासन कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सतर्क आहे. नागरिकांनी कोणत्याही भूलथापा किंवा खोट्या अफवांना बळी न पडता, काहीही माहिती असल्यास थेट प्रशासनाशी संपर्क साधून पडताळणी करावी, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.