
देवगड : देवगड एसटी आगारात शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनंत (अमित) रावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पप्पू जायभाय यांची देवगड एसटी आगार अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र आगार व्यवस्थापक सौरभ औंदकर यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी कार्याध्यक्षपदी देवगड तालुकाप्रमुख विलास साळस्कर यांची निवड करण्यात आली असून पांडुरंग कोळी यांची प्रमुख सल्लागार म्हणून निवड करण्यात आली असून प्रसिद्धी सचिवपदी प्रमोद मेघश्याम, तर खजिनदारपदी योगेश पांचाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या विविध पदांवरही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत नारिंगरेकर, शरद परब, ज्ञानेश्वर मुंडे आणि शैलेश पेडणेकर यांची निवड करण्यात आली. सचिवपदी जितेंद्र तेली, तर सहसचिवपदी रोशन मंचेकर, रुपेश गेडाम, अभिषेक वातकर आणि लक्ष्मण नागरगोजे यांची निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.












