LIVE UPDATES

ज्येष्ठांना मदत, सुरक्षा देण्यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर

पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांचे प्रतिपादन | कणकवलीतील ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती कार्यक्रम
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 16, 2025 19:44 PM
views 90  views

कणकवली : ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी शासन नेहमी तत्पर आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाईनही जाहीर करण्यात आली आहे. गरज असेल त्यावेळी त्याचा वापर करावा. ज्येष्ठांना मदत, त्यांची काळजी तसेच सुरक्षा देण्यासाठी पोलीस नेहमीच तयार आहेत, असे प्रतिपादन कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी केले.

कणकवली तालुका ज्येष्ठ ना    गरिक संघटनेची बैठक कलमठ येथील पेन्शनर्स भवन येथे सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला. या बैठकीत पीएसआय अनिल हाडळ, हवालदार सुभाष शिवगण यांनी मार्गदर्शन केले.

श्री. हाडळ, ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस हेल्पलाईन ७०३६६०६०६० क्रमांकासह इतरही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. त्याचा योग्य वापर करा. पोलीस यंत्रणा ज्येष्ठांची, जनतेची सुरक्षितता घेत आहे. ज्येष्ठांच्या अन्य प्रश्नांबाबत यंत्रणा कार्यरत आहे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. 

दादा कुडतरकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तर्हेने घालविता यावा, शारीरिक-मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क व सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण ठरवून १ जुलै २०१८ रोजी शासन निर्णय पारीत केला. गृह विभागाने, पर्यार्याने पोलीस खात्याने ज्येष्ठ नागरिक सभा घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, कायद्याबाबत प्रबोधन करून त्यांना आश्वासित करावे, असे अभिप्रेत आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह््यात तालुकास्तरावर पोलीस विभागामार्फत सभेचे नियोजन करण्यात येत आहे. पोलिसांनी ज्येष्ठांना सन्मानपूर्वक वागणूक द्याव व वेळप्रसंगी सुरक्षाविषयक मदत उपलब्ध करण्याबाबत सहकार्य करावे, असे कुडतरकर म्हणाले.

शासननिर्णयाची योग्य अंमलबजावणी होत असल्याबाबत पात्दकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, नूतन सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुपीकेश रावले, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचे, तसेच पोलीस विभाग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. चिकने यांचे आभार मानले पाहिजेत, असेही कुडतरकर म्हणाले.

या बैठकीत ज्येष्ठ नागरिक संघ, पेन्शनर्स असोसिएशन कणकवलीचे एस. एल. सपकाळ, प्रमोद लिमये, विलास चव्हाण, सेवा निवृत उपनिरीक्षक श्री. राणे, मोहन सावंत, कृष्णा दळवी, श्री. भोजे, श्री. पाटकर, गोविंद साळकर, गौरी साळकर, रिमा भोसले, सुरेखा महानज, प्रियांका दळवी, चंदक्रांत पाताडे, महादेव चव्हाण आदी सद‌स्य उपस्थित होते.