
सावंतवाडी : अनमोल प्रभागसंघ तळवडे मधील कामाक्षीदेवी उत्पादक गट कुंभार्ली-मळगाव यांच्या माध्यमातून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कामाक्षीदेवी साडी सेंटरचा शुभारंभ सावंतवाडी शहरात करण्यात आला. कामाक्षीदेवी उत्पादक महिला गटाच्या अध्यक्षा स्नेहल सचिन हरमलकर यांच्या पुढाकारातून हे दालन सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
कोकणसादच्या प्रधान कार्यालया शेजारी हे दालन सुरू करण्यात आले आहे. महिलांसाठी आकर्षक व दर्जेदार साड्या इथे उपलब्ध होणार आहेत. आज याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कामाक्षीदेवी उत्पादक गट कुंभार्ली मळगाव अध्यक्षा स्नेहल हरमलकर, उपाध्यक्षा विजया गवंडे, सचिव मानसी निवजेकर, तळवडे प्रभाग समन्वयक सचिन नाईक, जीवन ग्रामसंघ सचिव ममता नेरूलकर, कोषाध्यक्ष सिद्धी तेंडुलकर, हेमा खानोलकर, सारिका परब, श्रद्धा गांवकर, दिपिका मुळीक, सीमा गावडे, बीडीएसपी श्रृती रेडकर, प्रभागसंघ अध्यक्षा विशाखा ठाकूर, कोषाध्यक्षा संगीता राऊळ, सचिव रंजना तेली, सीआरपी रागिणी शिरोडकर आदी महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कामाक्षी देवी उत्पादक गटाचे शहरी भागात नवीन दालन सुरु करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सावंतवाडी व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.










