
- नूतन कार्यकारणीचा 19 जुलै रोजी पदग्रहण सोहळा
वेंगुर्ले : इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ले या क्लबच्या अध्यक्षापदी ज्योती प्रसन्ना देसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सई सुरेंद्र चव्हाण आणि सचिवपदी श्रीया मनीष परब यांची निवड करण्यात आली आहे. क्लब च्या वर्ष २०२६ – २७ या कार्यकाळातील नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात क्लबच्या नवनियुक्त अध्यक्षा ज्योती देसाई यांच्यासह उपाध्यक्षा सई चव्हाण, सचिव श्रीया परब तसेच खजिनदार वृंदा गवंडळकर, आयएसओ गौरी मराठे, संपादिका आरती गिरप या नव्या कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून पीडीसी डॉ. सायली प्रभू उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, इनरव्हीलचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि क्लबचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी नूतन कार्यकारिणीच्या आगामी वर्षातील समाजोपयोगी उपक्रमांची रूपरेषा जाहीर करण्यात येणार आहे.
महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्याचा क्लबचा मानस आहे. इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्यावतीने सर्व सदस्य, हितचिंतक आणि नागरिकांनी या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन कलबच्या मावळत्या अध्यक्षा अपर्णा बोवलेकर व त्यांच्या टीमच्यावतीने करण्यात आले आहे.










