LIVE UPDATES

Jijau Sanstha Water Conservation Campaign : दुष्काळाच्या संकटाआधीच जिजाऊंचा जलसंधारणाचा एल्गार

निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून शहापूर तालुक्यात ५४ वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट; १७ बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 07, 2026 04:49 PM
views 115  views
Women and villagers participating in Vanrai dam construction under Jijau Sanstha's water conservation campaign in Shahapur, Palghar.

पालघर : उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी वणवण आणि दरवर्षी ग्रामीण भागाला भेडसावणारी पाणीटंचाई लक्षात घेता, भविष्यातील दुष्काळाचे संकट रोखण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने आतापासूनच कंबर कसली आहे. पाण्याचे संकट निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संकट येण्याआधीच पाणी अडविण्याचा निर्धार संस्थेने केला आहे.

संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून शहापूर तालुक्यात ५० वनराई बंधारे उभारण्याची जलसंधारण मोहीम हाती घेण्यात आली असून, सावरोळी, गांगणवाडी, हिरव्याचीवाडी, लेनाड, नडगाव, बेलपाडा, भटपाडा , साकुर्लि, डोळखांब, खर्डी, झापवाडी, वडाचीवाडी, बांधणपाडा, वाऱ्याचापाडा, आपटे, उमवणेपाडा, टेंभा, भोसपाडा आतापर्यंत १८ बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण झाली आहे.

या मोहिमेअंतर्गत टेंभे व भोसपाडा (खर्डी) येथे लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्यात आले. शेकडो पोत्यांचा वापर करून वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले. विशेष म्हणजे या कामात स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने श्रमदान करत पुढाकार घेतला. त्यामुळे पाणी अडविण्याच्या कामासोबतच गावाच्या जलसुरक्षेसाठी महिलांची एकजूटही पाहायला मिळाली.

राज्यात दुष्काळाचे सावट गडद होण्याची शक्यता असताना पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची गरज निर्माण झाली आहे. शहापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण व दुर्गम भागांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याचा परिणाम नागरिकांसह शेतकरी, जनावरे आणि पशुपक्ष्यांवरही होतो. हीच बाब लक्षात घेऊन पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे आणि भूगर्भातील जलपातळी उंचावणे, या उद्देशाने जिजाऊ संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे.

महिलांच्या श्रमदानातून जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप

या मोहिमेत जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ प्रत्यक्ष श्रमदान करत आहेत. विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरत आहे. गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महिला स्वतः पुढे येत असल्याने या उपक्रमाला सामाजिक एकजुटीचे बळ मिळाले आहे.

या मोहिमेत महिला सक्षमीकरण प्रमुख तथा भिवंडी लोकसभा अध्यक्षा मोनिका पानवे, शहापूर तालुका प्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश निमसे, शहापूर तालुका कार्याध्यक्ष रंजना उघडा, शहापूर तालुका प्रमुख सुदर्शन पाटील, प्रवक्ते संदीप ठाकरे, विनोद निमसे, किशोर धसाडे, यशवंत वाख, विक्रांत शेलवले, शायरा शेख, अनिता शेने, श्रुती घोडविंदे यांच्यासह संपूर्ण जिजाऊ टीम सक्रियपणे परिश्रम घेत आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थांचेही सहकार्य लाभत आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' घोषणेपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा आदर्श निर्माण करण्याचा जिजाऊ संस्थेचा प्रयत्न आहे.

यावेळी बोलताना जिजाऊ संस्थेचे शहापूर तालुका प्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश निमसे म्हणाले, "पाणी ही काळाची गरज असून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येक गावाने जलसंधारणाच्या कामात सहभागी झाले पाहिजे. केवळ शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याची गरज आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुपक्ष्यांना पाण्याची कमतरता भासू नये, तसेच ग्रामीण भाग टँकरमुक्त व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे."

सामाजिक बांधिलकी जपत प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचे काम उभे करणाऱ्या जिजाऊ संस्थेच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, शहापूर तालुक्यातील गावोगावी अशीच जलसंधारणाची चळवळ उभी राहावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Vengurla News : मातोंड देवी सातेरीचे लोकप्रतिनिधींनी घेतले दर्शन
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : दक्षिण कोकणचे पंढरपूर जत्रोत्सवासाठी सज्ज
November 24, 2026
TVS Jupiter 110 Dual-Tone scooter new top-end variant in India
टीव्हीएस ज्यूपिटर 110 स्पेशल एडिशन बंद; आता 'ड्यूअल टोन व्हेरिअंट' टॉप मॉडेल, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
डिचोलीत २९ नोव्हेंबरला भव्य सत्कार सोहळा
November 24, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Vengurla News : मातोंड देवी सातेरीचे लोकप्रतिनिधींनी घेतले दर्शन
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : दक्षिण कोकणचे पंढरपूर जत्रोत्सवासाठी सज्ज
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
डिचोलीत २९ नोव्हेंबरला भव्य सत्कार सोहळा
November 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : नाथ पै. सभागृहाच्या देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष द्यावं
November 24, 2026