LIVE UPDATES

जामसंडे आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 02, 2026 19:41 PM
views 24  views

देवगड : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, देवगड शाखेच्यावतीने नशामुक्त भारत अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत देवगड तालुक्यातील विविध शाळा व विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन जनजागृती करण्यात येत आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून जामसंडे आयटीआय येथे विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या पल्लवी दीदी, संस्थेचे सदस्य तसेच देवगड शहर विकास समन्वय समितीच्या मुख्य समन्वयक शामल जोशी उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा तसेच समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला. पुढील आठवडाभर देवगड तालुक्यातील विविध शाळा व विद्यालयांमध्ये नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.