LIVE UPDATES

जामसंडे येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 08:46 PM
views 79  views

देवगड : जामसंडे श्रीकृष्णनगर येथील विलास यशवंत मुणगेकर (६४) यांचे सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास देवगड ग्रामीण रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश यशवंत मुणगेकर (६६, रा. खुडी घरटनवाडी) यांचे विलास मुणगेकर हे भाऊ आहेत. सोमवारी सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास रमेश यांना विलास हे जामसंडे येथील समृद्धी पेट्रोल पंपानजीक स्वतःच्या बाजूला गाडी लावून बसलेल्या अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी विलास यांना उपचाराकरिता देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.